सावदा, ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आधीच हद्दपार असून देखील शहरात वावरणार्या गुन्हेगाराला सावदा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
या संदर्भातील वृत्त असे की, सावदा शहरातील चांदणी चौक परिसरात वास्तव्यास असलेल्या शेख जाबीर शेख खलील या गुन्हेगाराला ९ जागेवारी २०२३ रोजी जळगाव आणि बुलढाणा या दोन जिल्ह्यांमधून हद्दपार करण्यात आले होते. ही कारवाई एक वर्षासाठी करण्यात आली होती.
दरम्यान, हद्दपार असतांना देखील शेख जाबीर शेख खलील हा घातक शस्त्रांसह सावदा शहरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या अनुषंगाने शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास त्याला अटक करण्यात आली आहे. यानंतर त्याला तुरूंगात रवाना करण्यात आले आहे.
ही कारवाई सहायक पोलीस निरिक्षक जालींदर पळे यांच्या नेतृत्वाखाली सहायक फौजदार महेमूद शहा, हवालदार उमेश पाटील, चौधरी, मोहसीन पठाण, किरण पाटील व मनोज तडवी यांच्या पथकाने केली आहे.