Home Cities जळगाव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पक्षप्रवक्तापदी मदन जाधव यांची नियुक्ती

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पक्षप्रवक्तापदी मदन जाधव यांची नियुक्ती


पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्याचे सुपुत्र जामनेर तालुक्यातील गोदरी गावचे रहिवासी मदन जाधव यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पक्षप्रवक्तपदी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. नाना पटोले यांनी केली.

मदन जाधव यांनी यापूर्वी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे व्ही. जे. एन. टी. सेलचे प्रदेश अध्यक्ष म्हणून उत्कृष्ट व चांगले काम केले या अगोदर एन. एस. यू. आय. प्रदेश पदाधिकारी म्हणून त्यांनी काम केले आहे. यासर्व कामाची व पक्ष संघटनेची कामाची दखल घेऊन त्यांची पक्षप्रवक्ता या पदावर नियुक्ती करण्यात आली. या संदर्भातील नियुक्तीचे पत्र प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार यांनी काढले आहे. मदन जाधव हे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या अत्यंत जवळचे व विश्वासातले पदाधिकारी आहेत त्यांच्या नियुक्तीने जळगाव जिल्ह्यातील काँग्रेस पक्षातील पदाधिकारी युवक काँग्रेस व एन. एस. यु. आय. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह व आनंदाचे वातावरण निर्माण झाले. मदन जाधव यांच्या नियुक्तीने त्यांचे सर्वत्र अभिनदंन होत आहे.


Protected Content

Play sound