पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा शहरातील व्यंकट गोपाल मंगल कार्यालयात अल्का ब्युटी प्लार्नरतर्फे मुंबई येथील सुप्रसिध्द इंटरनॅशनल मेकअप अॅण्ड हेअर आर्टीस्ट अल्का गोविंद यांच्या प्रमुख उपस्थितीत एक दिवसीय सेमिनार व “टॅलेंट शो” चे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम १३ जुन २०२३ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत एक दिवसीय सेमिनार व दुपारी ३ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत “टॅलेंट शो” चे आयोजन करण्यात आले असुन सेमिनार करिता प्रवेश फी ३०० रुपये व “टॅलेंट शो” करिता प्रवेश फी ११०० रुपये निश्चित करण्यात आली आहे.
याप्रसंगी ५० लकी ड्रॉ काढण्यात येणार असून विजेत्यांना ३०० रुपये रिटर्न गिफ्ट देण्यात येणार आहे. तसेच आयोजकांतर्फे उपस्थितांना अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली असुन उपस्थित सभासदांना ट्राॅफी व सर्टिफिकेट देण्यात येणार आहे. या सेमिनार व टॅलेंट शो चा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी रश्मी लढ्ढा, मेक ओव्हर आर्टिस्ट तेजल, हिना शेख, भाग्यश्री सोनार यांचेशी संपर्क साधावा असेही आयोजकांतर्फे कळविण्यात आले आहे.