एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | एरंडोल येथील गुरु हनुमान कुस्तीगीर संस्थेतर्फे कुस्तीगिरांचा सत्कार करण्यात आला.
एरंडोल येथील गुरु हनुमान कुस्तीगीर संस्थेतर्फे कुस्तीगिरांचा ढोलु महाजन नगर अमळनेर दरवाजा येथे गौरव करण्यात आला.याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार चिमणराव पाटील होते. याप्रसंगी दिपप्रज्वलन जनजाती विभाग प्रदेश समन्वयक भाजपा किशोर काळकर,प्रतिमा पूजन पोलीस निरीक्षक सतिष गोराडे यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी विशेष सत्कार देखील करण्यात आले.यात आमदार चिमणराव पाटील,मराठा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा.मनोज पाटील, जानकीराम महाजन, राजु साळी,पांडुरंग महाले यांचा समावेश होता.
दरम्यान ज्या कुस्ती गिरांनी सन २०२२ – २३ या वर्षात घवघवीत यश मिळवुन संस्थेचा,तालुक्याचा,जिल्ह्याचा,विभगाचा तथा विद्यापीठाचा गौरव वाढवला अशा योगेश्वरी मराठे,प्रेरणा मराठे,यामिनी आरखे,प्रांजल पाटील,भुमिका पाटील, भुषण आरखे,नयन आरखे,चेतन आरखे,सुजल भोई,पियूष मराठे,साई पाटील,राम पाटील,भावेश आरखे,कल्पेश पाटील,दर्शन पाटील,कुणाल कुंभार या कुस्तीगीरांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष देविदास महाजन,राजेंद्र चौधरी,निवृत्त तहसिलदार अरुण माळी,सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत महाजन,सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश अहिरे,सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद बागल,माजी उपनगराध्यक्ष सरला पाटील,छाया दाभाडे,बालमित्र व्यायाम शाळा माजी अध्यक्ष गोरख महाजन, अंग्लो उर्दू हायस्कूल अध्यक्ष जहिरोड्डिन शेख कासम,उत्पादन शुल्क विभाग पी.आय. लिलाधर पाटील,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड,सामाजिक कार्यकर्ते आनंद दाभाडे,माजी नगरसेवक नितीन चौधरी,पत्रकार जावेद मुजावर, राजधर महाजन,उपप्राचार्य डॉ.ए.ए. बडगुजर,शिवसेना तालुका प्रमुख रविंद्र जाधव,प्रा.आर.एस.पाटील,शिवसेना शहर संघटक मयुर महाजन,डॉ.राहुल पाटील,मनोज मराठे,संभाजी पाटील, गोपाल पाटील,आनंदा चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी हाजी अहमद खान, राजु मानुधने, आबा ठाकुर,सुभाष मराठे,भरत पाटील,इस्माईल पटेल,हनीफ पठाण, ड.अहमद सैयद,संतोष ठाकुर,संजय कुंभार,कैलास तायडे,शुभम चौधरी,रविंद्र जोगी,नरेंद्र निकम,नवल धनगर, राजु साळी,जानकीराम महाजन,बापू सोनार,निलेश मानुधने, डॉ.अतुल सोनवणे,लक्ष्मीकांत पाटील,पिंटू पाटील यांनी विशेष सहकार्य केले.कार्यक्रम यशस्वितेसाठी संस्थेचे अध्यक्ष भानुदास आरखे,उपाध्यक्ष पंकज पाटील,सचिव अनिल मराठे,खजिनदार ऋषिकेश महाजन,कार्याध्यक्ष दुर्गादास वानखेडे,सहसचिव दिलीप सोनवणे, ड.दिपक पाटील,संभाजी देसले,दिलीप पाटील,राजू साळी,अनिल पाटील,सदस्य नयन आरखे,अनिल आरखे,अनिल भोई,जावेद खाटीक,विजय महाजन,मनोज उंबरे,सविता आरखे,सुरेखा मराठे,सुरेखा सोनवणे,निपुर वानखेडे आदींनी परिश्रम घेतले.