Home राजकीय ‘रावेर पीपल्स’चा रणसंग्राम : लोकमान्य पॅनलच्या प्रचाराचा नारळ फुटला

‘रावेर पीपल्स’चा रणसंग्राम : लोकमान्य पॅनलच्या प्रचाराचा नारळ फुटला

0
46


रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या रावेर पिपल्स बँक निवडणुकीत लोकमान्य पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ ग्रामदैवत पाराच्या गणपती येथे नाराळ फोडुन करण्यात आला.

 

यावेळी ‘लोकमान्य पॅनल’चे उमेदवार प्रल्हाद रामदास महाजन,सोपान साहेबराव पाटील(दोघेकर तापी इरीगेशन) सजंय गंगाधर वाणी,विनायक सिताराम पाटील,राजेश सुधाकर शिंदे,मानस अरुण कुलकर्णी,पितांबर रामभाऊ पाटील, रविंद्र प्रभाकर महाजन महिला राखीव मतदारसंघ,योगिनी राजेश पाटील,शैलजा अशोक महाजन इतर मागासवर्गीय मतदारसंघ दिलीप हीरामन पाटील,भटक्या जाती जमाती मतदारसंघ अँड प्रविण सुपडू पाचपोहे अनुसूचित जाती मतदारसंघात विकास (मिलिंद)वामन अवसरमल यांनी विधीवत पूजा करून गणपती बाप्पा यांची आरती केली.

 

या प्रसंगी अनेक जेष्ठ पदाधिकारी यांनी मनोगत व्यक्त करत ‘लोकमान्य पॅनला’सर्व उमेदवारांना निवडुन देण्याचे अहवान केले.यावेळी बाजार समिती संचालक योगिराज पाटील,भाजपा जेष्ठ नेते सुरेश धनके,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, भाजपा तालुकाध्यक्ष राजन लासुरकर,उमेश महाजन,जे के पाटील सर,माजी नगरसेवक सुधीर पाटील,लखन महाजन संतोष लोखंडे,कांतिलाल महाजन,रावेर शिक्षण संवर्धक संघाचे अध्यक्ष प्रकाश मुजुमदार,रविंद्र पवार सर,व्ही व्ही पाटील सर,टी बी महाजन,सुधाकर बापु महाजन, कन्हैय्याशेट अग्रवाल,हरीष गनवानी,मोहन महाजन, भास्कर महाजन,अनिल अग्रवाल,शितल पाटील,यांच्यासह मोठ्या संख्येन कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound