Home क्राईम जामनेर तालुक्यातील अल्पवयीन मुलीचे अपहरण

जामनेर तालुक्यातील अल्पवयीन मुलीचे अपहरण


जामनेर लाईव्ह ट्रेन्स न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळून नेल्याची घटना समोर आली आहे. याबाबत मंगळवार १६ मे रोजी सायंकाळी ७ वाजता जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील एका गावात १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी वास्तव्याला आहे. १५ मे रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास पीडित मुलगी ही घरी एकटी असताना अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी आमिष दाखवत फुस लावून पळून नेत अपहरण केले, अशी तक्रार पीडित मुलीचा मामा यांनी जामनेर पोलीस ठाण्यात दिली आहे. मुलीचा सर्वत्र शोध घेतला असता ती कुठेही मिळून आली नाही, अखेर पीडित मुलीच्या मामाने दिलेल्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस ठाण्यात मंगळवारी १६ मे रोजी सायंकाळी ७ वाजता अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील करीत आहे.


Protected Content

Play sound