भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव तालुक्यातील कोठली येथील विनोद पाटील यांनी सारंगखेडा यात्रेतून आणलेल्या पवन नावाच्या घोड्याचे आजाराने आकस्मान मृत्यू झाला. जीवलग घोड्याचे अचानक जाण्याने पाटील परिवाराने आक्रोश केला होता. ग्रामस्थांच्या उपस्थितीत मृत घोड्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
घोडा मालक विनोद बापूराव पाटील रा. कोठली ता. भाडगाव यांनी घोड्यांसाठी प्रसिध्द असलेल्या सारंगखेडा येथील यात्रेतन पवन नावाच्या घोड्याला १ वर्षाचे असतांना विकत घेतले होते. या घोड्याला विनोद पाटील यांनी घरातील सदस्याप्रमाणे जीव लावून मोठे केले. लग्नकार्यासह इतर शासकीय कार्यक्रमात पवनने आपले नाव कमावले होते. गेल्या दोन दिवसांपासून त्याला अचानक एका आजाराने ग्रासले होते. त्याच्यावर पशुवैदयकीय औषधोपचार चालु असतांना १८ रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास परीवारासह शेकडो लोकांच्या उपस्थितीत पवन घोडयाने आपले प्राण सोडले.
पवन नावाने आरोळी मारताच हावभाव करणारा, मान डोलावणारा, किंकाळीरुपी आवाज देणार्या पवन घोडयाने जमिनीवर मान टाकीत त्याची प्राणज्योत मालविल्याची घटना घडली. घोडा मालक विनोद बापुराव पाटील रा. कोठली. ता. भडगाव. जि. जळगाव यांचे परीवारासह उपस्थित नागरीक, महिलांना रडु कोसळले. यावेळी मोठा आक्रोश करण्यात आला. आणि राञी शेकडो नागरीक, तरुण, महिलांच्या उपस्थित माणसाप्रमाणे पुजा, अर्चा, विधी करुन या पवन घोडयावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
आज या घोडयाची किंमत अंदाजे दिड ते दोन लाख आहे. शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे. या घटनेने संपुर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ए मेरे दोस्त लोटके आजा.. अब तेरे बीन जिंदगी अधुरी है। या हिंदी चिञपटाच्या गीता प्रमाणे सोशलमिडीयासह व्हाॅटसपवर शेकडो तरुणांनी या गिताचे स्टेटस ठेवले होते.
विनोद पाटील यांचे भाचे सुरेश बोरसे माजी सरपंच चिंचखेडे ता. चाळीसगाव जि. जळगाव यांनी सन २०१० मध्ये सारंगखेडयाच्या याञेतुन १ वर्षाचे हे घोडयाचे पिलु आणले होते. परंतु मामा विनोद पाटील कोठली यांनी हया घोडयाच्या पिलुची मागणी केली. हा घोडा मामाला दिला म्हणजे माझी कायम भेट होईल या भावनेने भाचा सुरेश बोरसे चिंचखेडे ता. चाळीसगाव यांनी मामा विनोद पाटील कोठली ता. भडगाव यांना सन २०११ मध्ये फक्त ५१ हजारांना हा घोडा दिला. हा घोडा तेव्हा फक्त दोनच वर्षांचा होता. विनोद पाटील यांनी या घोडयाचे नाव पवन असे ठेवले. परीवारातील सदस्यांप्रमाणे या घोडयाला जीव लावला. घोडयाला हिरव्या चाऱ्यासह खुराक लावला. विनोद पाटील यांचेसह परीवाराला या घोडयाचा चांगलाच प्रेमाचा लळा लागला होता. या पवन घोडयाला ट्रेनिंग देत परीसरात व तालुक्यात लग्न कार्यात वरातीत, गावात शिवजयंती मिरवणुक, जिजामाता जयंती, १५ आँगष्ट प्रजासत्ताक दिन , २६ जानेवारी स्वातंञ्य दिन अशा विविध कार्यक्रमात या पवन घोडयाला सजवुन मिरवणुकीत नेत असतं. नेहमी घोडया सोबत विकी पाटील व गोपाल पाटील हे दोघेही राहायचे. त्यांनी पवन म्हणताच हावभाव पाहत हा पवन घोडा इशारावर चालायचा. विशेष म्हणजे डीजे व बँडच्या आवाजातही हा पवन घोडा कधीच बिथरला नाही.
सारा परीसर हळहळला
पवन घोडयाला दोन दिवसापासुन आजाराने ग्रासलेले होते. विनोद पाटील यांनी खाजगी पशुवैदयकीय ५ ते ६ डाॅक्टरांचा सल्ला व औषधोपचार घेतले. दि. १८ रोजी सायंकाळी पवन घोडयाची अचानक जादा प्रक्रुती बिघडली. डाॅक्टरांचा औषधोपचार सुरु होता. प्रचंड व असहय वेदनांनी विव्हळत अचानक राञी ८.३० वाजेच्या सुमारास पवन या घोडयाची प्राणज्योत मालवली. डाॅक्टरांना या पवनच्या औषधोपचार करतांना निदानच कळले नाही. लाडक्या पवन घोडयाने जमिनीवर मान टेकत जीव सोडला. यावेळी विनोद पाटील यांचेसह परीवारातील सदस्यांनी व नागरीक, महिलांना रडु कोसळले. आक्रोश झाला. आमचा लाडका पवन आम्हाला सोडुन गेला. असा आक्रोश उपस्थितांसह मालकाच्या परीवारात सुरु होता. यावेळी सारे गाव घटनास्थळी जमलेले होते. लाडका पवन गेल्याचे दुख सार्यांना होते. सार्यांच्या डोळयात अश्रुंच्या धारा वाहतांना दिसत होत्या. राञी खळयाजवळच असलेल्या जागेत या पवन घोडयाचे माणसाच्या अंत्ययाञेप्रमाणे पुजा, अर्चा, विधी करुन नागरीकांच्या शेकडोंच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात अंत्यविधी करण्यात आला. यावेळी अंत्यविधीला ४०० च्या जवळपास नागरीक, तरुण, महिलांची उपस्थिती होती
प्रतिक्रीया —
पवन घोडा हा आमच्या परीवारातील सदस्यांसह नागरीकांमध्ये फारच लाडका होता. १४ वर्षापासुन पवनला सांभाळत लाडाने, प्रेमाने लहानाचा मोठा केला. पवनला दोन दिवसाच्या आजाराने कवटाळत पवनची प्राणज्योत मालवली आहे. आम्हा सार्यांना या दुखद घटनेची हळहळ सोसावी लागत आहे. पण त्याच्या आठवणी कायम आमच्या ह्रदयात राहतील.
– विनोद बापुराव पाटील. घोडा मालक. रा. कोठली. ता. भडगाव. जि. जळगाव.