Home Agri Trends प्रगतीशील शेतकरी किशोर राणे यांना “महाराष्ट्र केळीरत्न” पुरस्कार जाहीर

प्रगतीशील शेतकरी किशोर राणे यांना “महाराष्ट्र केळीरत्न” पुरस्कार जाहीर


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील येथील शहरातील प्रगतीशील केळी उत्पादक शेतकरी किशोर देवराम राणे यांची केळी उत्पादक शेतकरी संघाच्या वतीने महाराष्ट्र केळी रत्न कार्यगौरव पुरस्कार २०२३ साठी निवड झाली आहे.  किशोर देवराम राणे यांना हा पुरस्कार २३ एप्रिल रोजी रावेर जिल्हा जळगाव येथे आयोजित एका भव्य कार्यक्रमांमध्ये दिला जाणार आहे.

 

किशोर देवराम राणे हे गेल्या काही वर्षापासून दर्जेदार केळीचे विक्रमी उत्पादन घेत आहे. ते शेतात नवनवीन प्रयोग करतात दरम्यान मागील वर्षी त्यांची केळी विदेशात गेली होती. तेव्हा केळी उत्पादन घेतांना नावीन्यपूर्ण प्रयोग आणि दर्जेदार केळीचे उत्पादन काढणाऱ्या या शेतकऱ्याला त्याच्या या कार्याची दखल घेऊन त्याची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. त्यांना पुरस्कार समितीचे अध्यक्ष अतुल माने – पाटील, केळी उत्पादक शेतकरी संघाचे व्यवस्थापक किरण चव्हाण यांच्या वतीने सदर पुरस्कार त्यांना दिला जाणार आहे. तेव्हा त्यांची या पुरस्कारा करीता झालेल्या निवडीबद्दल त्यांचे यावल तालुक्यातुन सर्वत्र अभिनंदन होत आहे.


Protected Content

Play sound