Home Cities जळगाव अपार्टमेंटमधील मीटर रूमला शॉर्टसर्कीटमुळे आग

अपार्टमेंटमधील मीटर रूमला शॉर्टसर्कीटमुळे आग


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जुने जळगाव परिसरातील काशीबाई कोल्हे विद्यालयाजवळील यश अपार्टमेंटमधील पॅनल व मीटर रूमला शार्टसर्कीटमुळे मंगळवारी दुपारी अचानक आग लागली. महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या पथकाद्वारे ही आग विझविण्यात यश आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जुने जळगाव परिसरातील काशीबाई कोल्हे विद्यालयाजवळील यश अपार्टमेंट येथील पॅनल व मीटर रूमला शार्टसर्कीटमुळे मंगळवारी १८ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. याबाबत स्थानिक नागरीकांनी तात्काळ महापालिकेच्या अग्निशमन विभागाशी संपर्क करून आगीची माहिती देण्यात आली. आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्नीशमन विभागाचे पथक काही वेळातच घटनास्थळी दाखल झाले. फायर फायटरच्या मदतीने ही आग विझविण्यात आली व पुढील अनर्थ टळला. आग विझविण्यासाठी अग्नीशमन विभागाचे वाहन चालक युसूफ पटेल, फायरमन तेजस जोशी, पन्नालाल सोनवणे, गिरीश खडके, संजय खडके यांनी आग विझविण्यात सहकार्य केले. या आगीबाबत पोलीस ठाण्यात कुठलीही नोंदी करण्यात आलेली नाही.


Protected Content

Play sound