जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । २२ मार्च रोजी साजरी होणाऱ्या रमजान ईद ची तयारी इदगाहतर्फे अध्यक्ष वहाब मलिक यांच्या नेतृत्वात जनरल सेक्रेटरी फारुक शेख सह सचिव अनिस शाह व सर्व विश्वस्त मार्फत सुरू करण्यात आले असून आता पावेतो संपूर्ण इद गाह मैदान व कब्रस्तान मधील साफसफाई करण्यात आली.
सालार नगरकडून, बाबाहजरत उस्मान या गेट मधून येणासाठी नवीनच १३ नळांचे वजूखाना तयार करण्यात आला आहे. तर या पूर्वीच बावे अबूबक्र सिद्दिक या गेटवर २५ नळाचे वजूखानासह जुन्या मुख्यद्वार असलेल्या हजरत अली गेटवर ६० नळांचा वजूखाना नमाजी साठी तयार झालेला आहे. जळगाव शहर महानगरपालिकेने सुद्धा नगरसेवक रियाज बागवान यांच्या सहकार्याने इदगाह मैदानावर ३ हायमस्ट लॅम्प लावून दिले असून पूर्वी आ. भोळे यांच्या निधीतून एक हाय मस्ट लॅम्प लावण्यात आलेले आहे.
दरम्यान, मलिक परिवाराने सुद्धा आपल्या स्व खर्चाने स्वर्गवासी हाजी गफ्फार मलिक यांच्या नावाने अत्याधुनिक नाविन्यपूर्ण अशी थंड पाण्याची पाणपोई सुरू केली असून ती सुद्धा मौलाना उस्मान यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलेली आहे. आज मंगळवार रोजी साजरी होणाऱ्या शबे कद्रची तयारी ट्रस्टतर्फे करण्यात आली असून काही नातेवाईक हे आपल्या पूर्वजांच्या कबरीवर रंगरंगोटी करीत आहे. रमजान ईदची तयारी इदगाह ट्रस्टतर्फे सुरू असल्याची माहिती जनरल सेक्रेटरी फारुक शेख यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.