‘एक दुजे के लिये’ म्हणत त्यांनी उचलले असे पाऊल. . .आपल्याला वाचून बसेल धक्का !

नांदुरा-पुरूषोत्तम भातुरकर  | बुलढाणा जिल्ह्यातील सुनगाव शिवारात आज एक भयंकर घटना उघडकीस आली असून यात अल्पवयीन प्रेमी युगलाने स्वत:ला संपविल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 

जळगाव जामोद तालुक्यातील  सुनगाव ग्रामपंचायत हद्दीत येणार्‍या आदिवासी गाव असलेल्या कहू पट्टा येथील अल्पवयीन प्रेमीयुगलाने आज मृत्यूला कवटाळल्याचे उघडकीस आल्याने परिसर सुन्न झाला आहे.

 

आकाश पन्नालाल डाबर व प्रियंका भाईलाल मसाने यांनी थानसिंग मोरे यांच्या शेतातील पळसाच्या झाडाला दोरीच्या च्या साह्याने एकत्रितपणे एक दुजे के लिए गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक १६ एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली आहेत

 

गहू पट्टा येथील आदिवासी नागरिकांच्या हे बाब लक्षात येतात त्यांची तारांबळ उडाली. त्यांनी याबाबत सुनगावचे पोलीस पाटील तडवी यांना माहिती दिली, पोलीस पाटील तडवी यांनी विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली व पोलीस स्टेशन जळगाव जामोद याबाबत माहिती देण्यात आली.

 

जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे एपीआय कैलास चौधरी, पीएसआय शिवानंद वीर, बीड जमदार शेगोकार पोलीस कॉन्स्टेबल वावगे यांनी घटनास्थळी धाव घेत सदर प्रेमीयुगलाचे मृतदेह खाली उतरून त्याचा पंचनामा केला. सदर घटनेची तक्रार मृतक आकाश याचे काका सखाराम डावर यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला दिली. सदर प्रेमीयुगलाने आत्महत्या का केली ? याचे कारण समजू शकले नाही पुढील तपास ठाणेदार झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.

Protected Content