Home क्राईम मुक्ताईनगरातून आता चक्क मोटरसायकलवरून गुटख्याची तस्करी

मुक्ताईनगरातून आता चक्क मोटरसायकलवरून गुटख्याची तस्करी


 

 

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | चारचाकी वाहनातून होणार्‍या गुटखा तस्करीवर कारवाई होत असल्याचे पाहून आता मुक्ताईनगरातून चक्क मोटारसायकलवरून गुटख्याची तस्करी होत असल्याचे दिसून आले आहे.

 

 

आधीच्या काळापासून मुक्ताईनगर तालुका हा दोन नंबरच्या धंद्यांनी गाजलेला आहे. त्यामध्ये मोठमोठ्या कारवाई झालेली असताना आता गुटखा माफिया चक्क मोटरसायकल वरून गुटख्याची तस्करी करत असल्याचे दिसून आले आहे. मुक्ताईनगर तालुक्यात पूर्णाड फाट्याजवळ काल झालेल्या कारवाई ५६ हजार ८७२ रुपयाच्या मुद्देमाला सहित गुटखा पकडण्यात आलेला आहे.

या प्रकरणातील आरोपीचे नाव मोहम्मद एजाज सिद्दीक वय तीस वर्ष राहणार जाम मोहल्ला भुसावळ असे असून सदर कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दुनगहू व पोलीस उपनिरीक्षक संदीप चेडे यांनी केली आहे.


Protected Content

Play sound