Home क्राईम महिलेचा हात पकडून विनयभंग

महिलेचा हात पकडून विनयभंग


जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या महिलेचा हात पकडून विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. या संदर्भात जामनेर पोलीस ठाण्यात सोमवार १० एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील एका गावात ३५ वर्षीय महिला हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान १० एप्रिल रोजी सकाळी ९.३० वाजता महिला ही घरात धुणे भांडी करीत असताना गावात राहणार भागवत उखर्डू पाटील हा घरात घुसला. त्यानंतर पाठीमागे येऊन तिचा हात पकडून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. तसेच महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत तोडून टाकली. हा प्रकार घडल्यानंतर महिलेने सायंकाळी ५ वाजता जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार संशयित आरोपी भागवत उखर्डू पाटील यांच्या विरोधात जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जयसिंग राठोड करीत आहे.


Protected Content

Play sound