Home Cities मुक्ताईनगर बापरे… वीज कोसळल्याने ९ बकऱ्या ठार; गुराखी थोडक्यात बचावला

बापरे… वीज कोसळल्याने ९ बकऱ्या ठार; गुराखी थोडक्यात बचावला


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील रामगड येथे विज कोसळल्याने ९ बकऱ्या ठार झाल्याची घटना घडली आहे. यात सुदैवाने गुराखी बालंबाल बचावला आहे. ही घटना शुक्रवारी ७ रोजी साडेचारच्या सुमारास रामगड तलावाच्या भींतीजवळ घडली.

रामगड येथील पशुपालक अतुल बिलाले स्वत:च्या शेळ्यासह इतरांच्या शेळ्या चारण्यासाठी वस्ती जवळच्या पाझर तलावालगत गेला होता.सायंकाळी साडे-चार वाजण्याच्या सुमारास मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने सुरुवात झाली.दरम्यान घरी परतीच्या वाटेवर असलेल्या शेळ्यांच्या कळपावर अचानक वीज कोसळून  शेळ्या जागीच ठार झाल्या.या घटनेत अतुल यास किरकोळ दुखापत झाली असुन उपचारार्थ मुक्ताईनगर येथे दाखल करण्यात आले आहे. यात गुलाबसिंग बिलाले यांच्या ५ शेळ्या,तारासिंग बिलाले यांच्या ३ शेळ्या, लटु बिलाले यांची १ अशा एकुण ९ शेळ्या मृत्युमुखी पडल्या. दरम्यान शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यत प्रशासनाकडुन घटनास्थळी पंचनाम्यासह इतर सोपस्कार पार पाडण्याची प्रक्रिया सुरु होती.उचंदे येथील पशुवैद्यकिय अधिकारी डॉ प्रशांत लोढे यांनी घटनास्थळाकडे तातडीने धाव घेत मृत शेळ्यांचे शवविच्छेदन केले.


Protected Content

Play sound