महापुरूषांच्या पुतळ्यांची विटंबना करणाऱ्यांना अटक करा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील दीक्षितवाडी येथे असलेला तथागत भगवान बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांची विटंबना केली होती. या संदर्भात दाखल गुन्ह्यातील आरोपींना अटक करावी, या मागणीसाठी शुक्रवार ७ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता पद्मालय विश्रामगृह येथे बौद्ध वसाहत सेवा संघाच्या वतीने पत्रकार परिषदेतून केली आहे.

 

जळगाव शहरातील दीक्षितवाडी येथे असलेल्या तथागत भगवान गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा १६ मार्च रोजी सकाळी १० पोलिसांच्या बंदोबस्तात हटवण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान समाज बांधवांनी आक्रमक भूमिका घेत  दिक्षीत वाडी आणि जिल्हापेठ पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले होते. या संदर्भात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात ३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर अद्याप पर्यंत कोणत्याही संशयताला अटक करण्यात आलेले नाही.

 

महापुरुषांचा पुतळा हटवण्यासंदर्भात माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे यांनी अधिवेशनात हा प्रश्न उठवला होता. तसेच समाज बांधवांनी विविध संघटनेच्या माध्यमातून पुतळ्यांची विटंबना करणाऱ्यांना अटक करावी अशी मागणी केली होती. परंतु अद्याप पर्यंत याबाबत कुठलेही कारवाई करण्यात आलेले नाही. शिवाय जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी देखील पुतळांसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत देखील कुठलाही तोडगा निघालेला नाही, त्यामुळे पुतळ्यांची विटंबना करणाऱ्या तिघांना अटक करावी, अशी मागणी बौद्ध वसाहत सेवा संघाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे

Protected Content