Home Cities अमळनेर जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अमळनेर येथे वृक्षारोपण

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अमळनेर येथे वृक्षारोपण

989901ba ae72 4d7d 8016 7e03a0ee13a4
989901ba ae72 4d7d 8016 7e03a0ee13a4

989901ba ae72 4d7d 8016 7e03a0ee13a4

अमळनेर (प्रतिनिधी) येथील बस स्थानक परीसरात सावलीसाठी झाडे नसल्याने प्रवाशांना तीव्र उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यावर उपाय म्हणून आज (दि.५ जून) जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून साई इंग्लिश अकॅडमीतर्फे या भागात वृक्षारोपण करण्यात आले.

 

शहरातील सामाजिक संस्थांनी याबाबत पुढाकार घेऊन या भागात वृक्षरोपण करावे, अशी मागणी काही दिवसांपासून सातत्याने जोर धरू लागली होती. वृक्षारोपणप्रसंगी आगार व्यवस्थापक सौ.अर्चना देवरे, साई इंग्लिश अकॅडमीचे संचालक भैय्यासाहेब मगर, स्थानक प्रमुख संजय बाविस्कर, श्री साळुंखे, रामकृष्ण
पाटील, तुषार साळुंखे, लक्ष्मण पाटील यांच्यासह एस.टी. कर्मचारी व सर्व युनियनचे पदधिकारी तसेच साई इंग्लिश अकॅडमीचे शिक्षकवृंद, आजी-माजी विद्यार्थी प्रफुल्ल संदानशिव, खिलेश पवार, उत्कर्ष शिसोदे,अतुल सणस, लोकेश बोरसे, अनिकेत पाटील, धर्मेशकुमार खैरनार, विराज चव्हाण, प्रतीक वाघ हे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी एस.टी.कर्मचारी मनोज पाटील व योगेश घोडके यांचे विशेष सहकार्य लाभले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound