Home क्राईम पैश्याच्या वादातून मारहाण करून खून करणाऱ्यास अटक

पैश्याच्या वादातून मारहाण करून खून करणाऱ्यास अटक


Arest Jail Pakrau 1

जळगाव प्रतिनिधी । पैश्याच्या वादातून हनुमान नगर येथील एकावर मारहाण करून खून केल्याप्रकरणी आरोपीवर जिल्हापेठ पोलीसांत दाखल असलेल्या गुन्ह्यात फरार आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. आरोपीस पुढील कारवाईसाठी जिल्हा पेठ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, वासूदेव त्र्यंबक डांगे वय 52, रा. हनुमान नगर याचे पैश्यांच्या वादातून संशयित आरोपी सतिष आण्णा भोपाळे वय 42 रा. सिध्दीविनायक शाळेमागे, हनुमान नगर याने 4 जून रोजी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास शहरातील न्य. बी.जे. मार्केट समोर चापटा बुक्क्यांनी मारहाण केली होती. या मारहाणीत वासूदेव डांगे हा मयत झाला. या प्रकरणी संशयित आरोपी सतिष भोपाळे यांच्या विरोधात जिल्हा पेठ पोलीसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मारहाण करून संशयित आरोपी सतिष हा फरार होता. दरम्यान संशयित आरोपी हा शहरातच असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, उपर पोलीस अधिक्षक लोहित मतानी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहम यांनी पथक तयार करून पथकातील पोहकॉ रवींद्र गिरासे, चंद्रकांत पाटील, विजय पाटील, दिनेश बडगुजर, पो.कॉ. विजय एस पाटील, सचिन महाजन, नरेंद्र वारूळ अश्यांनी शहरात सापळा रचून संशयित आरोपी सतिष भोपाळे याला अटक केली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound