रावेर शहरासह तालुक्यात रमजान ईद उत्साहात साजरी

4d83d647 ae14 42ec b57a 3471588b3d52

रावेर (प्रतिनिधी) मानवतेची शिकवण आणि आत्मशुद्धीचे पर्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रमजान महिन्याची सांगता होऊन मुस्लीम बांधवांनी पारंपरिक प्रथेनुसार उर्दू महिना शव्वालच्या १ तारखेला आज बुधवारी (दि.५) सकाळी ८.४० वाजता शहरासह तालुक्यात ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद साजरी केली. ईदनिमित्त सालाबादप्रमाणे शहरातील उरखेडा रोडवरील ईदगाह मैदानावर सामुदायिक नमाजपठण करण्यात आले.

 

सकाळी ८.३० मिनिटांनी जामा मसजिदीचे इमाम हाफीज सईद प्रथम खुतबा पठन करून नमाजपठणाला प्रारंभ केला. धर्माचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्यावर अधारित दरुदोसलामचे उपस्थित जनसमुदायाकडून पठण करण्यात आले. यानंतर राज्यात भरपूर पाऊस पडू दे. देशात सर्वत्र शांतता नांदू दे, अशी प्रार्थना केली. त्यानंतर मुस्लीम बांधवांनी एकमेकांची गळाभेट घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. तसेच उपस्थित हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांची गळा भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी नगराध्यक्ष दारा मोहम्मद, भुसावळचे माजी नगराध्यक्षक अनिल चौधरी, माजी नगराध्यक्ष हरीश गणवणी, ज्ञानेश्वर महाजन, अॅड.एम.ए. खान, उपनगराध्यक्ष असद खान, नगरसेवक अय्युब खान, सादिक शेख, ग्यास शेख, युसूफ खान, शीतल पाटील, दिलीप कांबळे, पो.पाटील लक्ष्मीकांत लोहार, जगदीश घेटे, राजेंद्र अटकाळे, ग्यास काजी, उपस्थित होते.

या वेळी फैजपूर विभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे, तहसीलदार उशारणी देवगुणे, रावेर पो.नि. रामदास वाकोडे, पो.उ.नि. पाळदे, गोपनीय शाखेचे राजेंद्र करोडपती, मंदार पाटील, हे.कॉ. बी.डी. सोपे, विकास पहूरकर, हे.कॉ. नंदकुमार, डी.डी. चौधरी, चंद्रकांत शिंदे, योगेश चौधरी, तसेच राज्य राखीव पोलीस बल अमरावती यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

तालुक्यातही ईद साजरी :- तालुक्यातील रसलपूर येथील शाही ईदगहा मैदानावर सामूहीक पवित्र रमजान ईदनिमित्त नमाजपठण केल्यानंतर एकमेकांनी गळाभेट घेऊन शुभेच्छा दिल्या. अन्य नागरिकांनीही मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. रमजान ईद निमित्ताने रसलपूर येथील मशिदीत मौलाना यांनी ईद उल फित्रची नमाज पठन केली. यावेळी सुरेश धनके, सरपंच हानीफ खान, पी के महाजन, सचिन जाधव, शरीफ बेग, असलम नजीर, अन्य उपस्थित होते.
तालुक्यातील पाल येथे शाही ईदगाह मध्य मौलाना शरीफ यांनी ईदची नमाज पठण केली. सकाळी ९.०० वाजता नमाज पठन करण्यात आले. यावेळी सरपंच कामील तडवी, व सदस्य तसेच पाल दुरक्षेत्रचे पी.एस.आय. नाजीम शेख व सहकारी उपस्थित होते.उपस्थितांनी एकमेकांना ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या.

तालुक्यातील कर्जोद येथे ८/३०ला ईदची नमाज सुन्नी मसजिद व मदिना मसजिदमध्ये अदा करण्यात आली. ईदचे नमाज पठण पार पडल्यानंतर आपल्या नातेवाइकांच्या घरी हजेरी लावून समाज बांधवांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार खास खाद्यपदार्थ शिरखुर्म्याने करण्यात आला. शिरखुर्म्याच्या गोडव्याप्रमाणे नातेसंबंधातील गोडवा वाढावा, अशीच अपेक्षा यावेळी सगळ्यांनी व्यक्त केली. दरम्यान, मुस्लीम बहुल परिसरात दिवसभर शिरखुर्म्याचा आस्वाद घेतला जात असल्याने सुगंध दरवळला होता.

विश्वाच्या कल्याणासाठी नमाज पठणानंतर दुआ करण्यात आली. मानवजातीच्या कल्याणासाठी व विश्वशांतीकरिता विशेष दुआ केली गेली. यावेळी शहरासह संपूर्ण देशाचे संरक्षण तसेच उत्तरोत्तर प्रगतीसाठीही प्रार्थना करण्यात आली. तालुक्यातील खानापूर गावातही ईद उत्साहात साजरी करण्यात आली. नमाजनंतर येथे रमजान ईदनिमित्त गावातील बांधवांनी तंटामुक्ती समिती सदस्य खलिल शे. दादामिया यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष कुमार नरवाडे, प्रविण शिवरामे, योगेश्वर महाजन, दिलीप पाटील, रवींद्र भारते, दिवाकर पाटील आदी उपस्थित होते.

Add Comment

Protected Content