जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील समता नगरातील १९ वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना रविवारी १९ मार्च रोजी दुपारी ३ वाजेच्या समोर आली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विशाल हिरालाल सोनवणे (वय-१९) रा. समता नगर, जळगाव असे मृत झालेल्या तरूणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, विशाल सोनवणे हा तरूण आपल्या आई, आजी व मोठा भाऊ गौतम यांच्यासोबत वास्तव्याला होता. मजूरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करीत होता. रविवारी १९ मार्च रोजी दुपारी राहत्या घरात विशालने गळफास घेवून आत्महत्या केली,. दुपारी त्याचा भाऊ गौतम सोनवणे हा घरी आला. त्यावेळी घराचा दरवाजा आतून बंद होता. दरवाजा उघडल्यानंतर विशाल याने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. भावाचा मृतदेह पाहून गौतमसह नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. रामानंदनगर पोलीस कर्मचाऱ्यांना घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह जिल्हाशासकीय वैदृयकीय महाविद्यालया नेण्यात आला. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात आई, भाऊ गौमत, आजी व बाबा असा परिवार आहे.