जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील दिक्षीतवाडी येथील पुतळ्या स्थलांतरीत करण्याबाबत राजकीय फायदकरीता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी बदनाम करण्याचे काम केले आहे. सामाजिक भावना दुखावल्याप्रकरणी माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीचे निवेदन रिपाइंच्या वतीने पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांना देण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिक्षीतवाडी येथील स्थलांतरीत करण्याबाबत १६ मार्च रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुध्द यांच्या यांचा पुतळा स्थलांतरीत करण्याबाबत वाद निर्माण झाला होता. या छोट्या वादामुळे विधीमंडळात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी जिल्ह्याचा प्रश्न उपस्थित करून जिल्ह्याचे नाव बदनाम करण्याचे काम केले आहे. जिल्ह्यासह राज्याचे वातावरण देखील खराब होण्याचे काम केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणीचे निवेदनन शनिवारी १८ मार्च रोजी दुपारी १२ वाजता पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांना देण्यात आले. या निवेदनावर रिपब्लीकन पाटील ऑफ इंडीयाचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल, प्रताप बनसोडे, अनिल लोंढे, किरण अडकमोल, गौतम सरदार, मनोज वाणी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.