‘मराठी मायबोलीचा अभिमान हाच मराठी मनाचा स्थायीभाव आहे’ – प्राचार्य, डॉ. किसन पाटील

जळगाव प्रतिनिधी । ‘मराठी मायबोलीचा अभिमान हाच मराठी मनाचा स्थायीभाव आहे’ असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ. किसन पाटील  यांनी केले. ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित्ताने पाचोरा महाविद्यालयात भाषा सेवा कार्याबद्दल सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्या प्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ. किसन पाटील (ज्येष्ठ साहित्यिक) यांनी मनोगत व्यक्त केले. 

त्यावेळी ते पुढे म्हणाले, मराठीच्या संवर्धनासाठी बोलीभाषांचा वापर, साहित्य निर्मिती, पाठ्यपुस्तकांची निर्मिती, प्रशासकीय कामकाज आणि न्यायालयीन उपयोजनासह मराठी संशोधन, कोश वाङ२मय निर्मिती तसेच प्रसार माध्यमातून मातृभाषेचा उपयोग सतत केला पाहिजे. केवळ भावनिक संवर्धनापेक्षा मातृभाषेतून शिक्षण आणि मराठी भाषेचा संवाद संप्रेषणातील उपयोजन व्यवस्था जाणिवपूर्वक जोपासायला हवी. साहित्याची भाषा, व्यावहारिक भाषा आणि प्रशासकीय भाषांतून लोकसंवाद, लोकशिक्षण घडले पाहिजे. तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाच पाहिजे. या प्रसंगी प्राचार्य डॉ. किसन पाटील (ज्येष्ठ साहित्यिक) आणि श्री. रंगराव पाटील (प्रकाशक) यांचा भाषासेवा, ग्रंथ निर्मिती आणि प्रकाशन व्यवहारातील योगदानाबद्दल प्रतिनिधिक गौरवपूर्ण सन्मान केला. सन्मान चिन्ह, मानचिन्ह देऊन त्यांचा यथोचित सत्कार केला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. बी. एन. पाटील यांनी अध्यक्षीय मनोगत व्येक्त केले. प्रा. डॉ. वासुदेव वले यांनी प्रास्ताविकातून भूमिका मांडली. उपप्राचार्य शरद पाटील (कनिष्ठ महाविद्यालय), प्रदीप पाटील आणि सर्व प्राध्यापक, विद्यार्थी विद्यार्थिनी  पस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. स्वप्नील भोसले यांनी केले.

Protected Content