Home Cities बोदवड आ. चंद्रकांत पाटलांच्या पाठपुराव्याने बोदवडच्या तलावाची होणार सफाई !

आ. चंद्रकांत पाटलांच्या पाठपुराव्याने बोदवडच्या तलावाची होणार सफाई !

0
33

बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्याने शहरातील तलावाच्या सफाईसाठी राज्य शासनाकडून निधी मिळाला आहे.

बोदवड शहरातील गाव तलावाची साफ-सफाई करण्यात यावी अशी मागणी कधीपासूनच करण्यात येत होती. आमदार चंद्रकांत पाटील यांनी या संदर्भात राज्याच्या नगरविकास खात्याकडे मागणी केली होती. या पाठपुराव्यामुळे आता या तलावाच्या सफाईसाठी एक कोटी ८५ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

या निधीमुळे गेल्या प्रदीर्घ काळापासून मागणी होत असलेल्या बोदवडमधील गाव तलावाच्या सफाईचा प्रश्‍न मार्गी लागणार आहे. यामुळे येथील नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत मोकळे होऊन सुशोभीकरणात भर पडणार आहे. या संदर्भातील शासकीय परिपत्रक देखील जाहीर करण्यात आल्याची माहिती आमदार चंद्रकांत पाटील यांचे स्वीय सहायक प्रवीण चौधरी यांनी दिली आहे.


Protected Content

Play sound