सुपरस्टार रजनीकांत मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंची घेतली भेट

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सुपरस्टार मातोश्रीवर पोहोचले आहेत. त्यांनी उद्धव ठाकरेंची भेटही घेतली आहे.

 

रजनीकांत उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी मातोश्रीवर आले आहेत. रजनीकांत यांचे ठाकरे कुटुंबीयांशी कौटुंबिक नातेसंबंध आहेत. त्यामुळे ही भेट होत आहे.

 

रजनीकांत मुंबईतल्या वानखेडे स्टेडिअममध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ही मॅच पाहायला आले होते. बीसीसीआयकडून त्यांना विशेष निमंत्रण देण्यात आलं होतं. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांनी त्यांचं स्वागतही केलं.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content