Home टेक्नोलॉजी बोदवड तालुक्यात मोबाईल नेटवर्कचा बोजवारा 

बोदवड तालुक्यात मोबाईल नेटवर्कचा बोजवारा 

0
13


बोदवड-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । बोदवड तालुक्यात गुरुवारी, २२ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजेपासून जिओ मोबाईल नेटवर्कच्या सेवेत अडथळे निर्माण झाल्याने ग्राहकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. मोबाईलला नेटवर्कची रेंज मिळण्यात अडचणी येत असल्याने कॉलिंगसह इंटरनेट सेवेवरही परिणाम झाल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून करण्यात येत आहेत. या समस्येमुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

आजच्या डिजिटल युगात मोबाईल नेटवर्क ही नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील महत्त्वाची गरज बनली आहे. ऑनलाइन आर्थिक व्यवहार, यूपीआय पेमेंट, शासकीय कामकाज, विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण तसेच व्यावसायिक संपर्कासाठी मोबाईल इंटरनेटचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. मात्र, जिओ नेटवर्कमधील अडथळ्यांमुळे या कामांमध्ये व्यत्यय येत असून, ग्राहकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. सकाळपासूनच नेटवर्कची समस्या जाणवत असल्याने अनेक ग्राहकांना मोबाईलवरून संपर्क साधताना तसेच इंटरनेटचा वापर करताना अडचणी येत असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेषतः ऑनलाइन व्यवहार आणि इंटरनेटवर अवलंबून असलेली कामे करताना नेटवर्कची समस्या त्रासदायक ठरत आहे. मोबाईल सेवा नियमित सुरू राहावी, अशी अपेक्षा ग्राहकांकडून व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, बोदवड तालुक्यात जिओ नेटवर्कची समस्या नेमकी कशामुळे उद्भवली, याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध नसल्याने ग्राहकांमध्ये संभ्रम आहे. नेटवर्कमधील तांत्रिक बिघाड आहे की अन्य काही कारणामुळे सेवा विस्कळीत झाली आहे, याबाबत स्पष्टता मिळालेली नाही. संबंधित कंपनीने नेटवर्कमधील अडचणीची दखल घेऊन समस्येचे कारण स्पष्ट करावे आणि सेवा तातडीने पूर्ववत करावी, अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे. नेटवर्क सेवा कधी सुरळीत होणार, याकडे आता बोदवड तालुक्यातील मोबाईलधारकांचे लक्ष लागले आहे.


Protected Content

Play sound