Home Cities धरणगाव धरणगावात गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

धरणगावात गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

0
48

 

 

gulabrav patil 11

धरणगाव प्रतिनिधी । धरणगाव येथे दिनांक ५ जून रोजी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या ५२वा वाढदिवसाच्या निमित्ताने धरणगाव शहरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
यासंदर्भात माहिती अशी की, शिवसेना शहर शाखा, युवासेना, विद्यार्थी सेना व अल्पसंख्याक संघटनांतर्फे धरणगाव ग्रामीण रुग्णालयात सकाळी १० वाजता फळ वाटप तसेच मुखबधिर विद्यालयात १० वाजून 30 मिनिटांनी फळ वाटप तर ११ वाजता धरणगाव बसस्थानक सुशोभिकरण कामाचे भूमिपूजन तसेच विविध शाखांतर्फे वह्या वाटप करण्यात येणार आहे. ११ वाजून ३० मिनिटांनी गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन समारंभ व फिल्टर प्लांट पाण्याचे वितरण करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांनसाठी एक लाख वह्यांचे वाटप व स्वर्गरथ देण्यात येणार आहे. या सर्व कार्यक्रमाला सहकार राज्य मंत्री गुलाबराव पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, लोकनियुक्त नगराध्यक्ष सलीम पटेल, उपनगराध्यक्ष अंजली विसावे सह सर्व नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तर या सर्व कार्यक्रमानंतर सहकार राज्य मंत्री गुलाबराव पाटील पत्रकार बांधवांशी संवाद साधतील.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound