Home क्राईम गंजेवाडा येथे कुंटुंबावर जीवघेणा हल्ला

गंजेवाडा येथे कुंटुंबावर जीवघेणा हल्ला

0
37

भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव तालुक्यातील गंजेवाडा येथे कारण नसतांना दारूच्या नशेत एकाच कुटुंबातील तीन जणांना कुऱ्हाडीने मारहाण करून गंभीर दुखापत केली. याप्रकरणी शनिवारी ११ मार्च रोजी भडगाव पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

भडगाव पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, विठोबा बळीराम मिस्तरी (वय-३९) रा.गंजेवाडा ता. भडगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. फर्निचरचे दुकान लावून आपला उदरनिर्वाह करतात. शुक्रवार १० मार्च रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास विठोबा मिस्तरी ही घरी असतांना काहीही कारण नसतांना गावातच राहणारे युवराज मुरलीधर गंजे, सुनिल शिवाजी गंजे, साहेबराव मुरलीधर गंजे, मुरलीधर रतन गंजे आणि तुषार युवराज गंज यांनी विठोबा मिस्तरी व त्याचे वडील विठोबा मिस्तरी व रंजना मिस्तरी यांना बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली. या मारहाणीत युवराज गंजे याने हातीती कुऱ्हाड विठोबा मिस्तरी याच्या डोक्याला मारली. यात ते जखमी झाले. याबाबत शनिवारी ११ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता मारहाण करणारे पाच जणांविरोधात भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर करीत आहे.


Protected Content

Play sound