Home Cities जळगाव संजय पवार यांच्या उमेदवारीमुळे जिल्हा बँक अध्यक्षपदाच्या निवडीत ‘ट्विस्ट’

संजय पवार यांच्या उमेदवारीमुळे जिल्हा बँक अध्यक्षपदाच्या निवडीत ‘ट्विस्ट’

0
70

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्हा बँक अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते संजय पवार यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केल्याने या प्रक्रियेत मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आज जिल्हा बँक अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील यांचे नाव निश्‍चीत करण्यात आले आहे. याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. असे असतांनाही संजय पवार यांनी देखील अध्यक्षपदासाठी अर्ज भरला आहे. यामुळे या निवडणुकीत चुरस निर्माण होण्याचे संकेत आहेत.

संजय पवार यांना राष्ट्रवादीतील एक गट आणि शिंदे गटाच्या संचालकांचा पाठींबा मिळाला तर ते या निवडणुकीत उलटफेर करू शकतात. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे संचालक एकसंघ राहिल्यास त्यांचे बंड फसू शकते. यामुळे आता या निवडणुकीत नेमके काय होणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Protected Content

Play sound