जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मु. जे. महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागात 28 फेब्रुवारी ला राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. विज्ञान रैलीत विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्र. के. पी. नारखेडे यांनी केले. त्यानंतर मान्यवर डॉ मिलिंद पाटील पी. एस. जी.वी.पी.एस. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स महाविद्यालय, शहादा यांनी “ग्रीन केमिस्ट्री” विषयावर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांसाठी विज्ञान प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात आली. तसेच पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेसाठी डॉ मिलिंद पाटील पी. एस. जी.वी.पी.एस. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स महाविद्यालय, शहादा हे परिक्षक म्हणून लाभले. बक्षिस वितरण समारंभ डॉ. भुषण कविमंडण यांच्या उपस्थितीत पार पडला.
सदर कार्यक्रमास विद्यार्थ्यांनी भरभरुन प्रतिसाद दिला. संपूर्ण कार्यक्रमासाठी प्राचार्य सं. ना. भारंबे व विभागप्रमुख डॉ. योगेश मोरे यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाचे नियोजनात प्रा. सोनल उपलपवार, प्रा. डॉ. जयश्री भिरूड, प्रा. डॉ. आर. डी. पाटील, डॉ. मनोज पांडे, प्रा. डॉ. वसीम शेख, प्रा. डॉ. राहुल महीरे, प्रा. संदीप पाडवी, प्रा. आरजु काझी, प्रा. ऐश्वर्या परदेशी या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.