Home क्राईम विवाहितेला पैशांची मागणी करत तिचा छळ:

विवाहितेला पैशांची मागणी करत तिचा छळ:


जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ! जळगाव शहरातील शाहू नगरातील विवाहितेला पैशांची मागणी करत तिचा छळ करणाऱ्या पतीसह सासरच्या ४ जणांविरोधात शुक्रवार, २४ फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार असे की, जळगाव शहरातील शाहू नगरातील रुक्सार समीर पिंजारी वय २१ यांचा विवाह शाहू नगरातील समिर सत्तार पिंजारी यांच्यासोबत झाला आहे. लग्नानंतर काही दिवसांनी पतीसह सासरच्या मंडळींनी रुक्सार हिच्याकडे पैशांची मागणी, माहेरुन आई वडीलांकडून पैसे आणावेत अशी वारंवार मागणी करत रुक्सार हिला वेळावेळी शिवीगाळ करत चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच वाईट साईट बोलून शारिरीक तसेच मानसिक छळ केला,  या छळाला कंटाळून रुक्सार या माहेरी निघून आल्या व त्यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन रुक्सार हिचे पती समीर सत्तार पिंजारी, सासू रेहाना पिंजारी, सासरे सत्तार शाहबुद्दीन पिंजारी, दीर जमीर सत्तार पिंजारी रा. शाहू नगर या चार जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल अनिता वाघमारे ह्या करीत आहेत.


Protected Content

Play sound