Home राजकीय मुश्रीफांचा घोटाळा ५०० कोटींच्या वर ! सोमय्यांचा आरोप

मुश्रीफांचा घोटाळा ५०० कोटींच्या वर ! सोमय्यांचा आरोप

0
43


कोल्हापूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | माजी मंत्री हसन मुश्रीफ यांचा घोटाळा हा ५०० कोटींच्या वर असल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबावर माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आधीच आरोप केलेले आहेत. याचबाबत ते आज कोल्हापुरात दाखल झाले आहेत. आज सकाळी पत्रकारांशी बोलतांना त्यांनी मुश्रीफ यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. ते म्हणाले की, हसन मुश्रीफ यांनी शेतकर्‍यांना लुटण्यासाठी बँकेलाही सोडलं नाही. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि घोरपडे सहकारी साखर कारखान्यालाही लुटण्यात आलं. आता त्यांची सर्व बाजूने चौकशी सुरू आहे. या कारवाईची माहिती घेण्यासाठी आणि पाठपुरावा करण्यासाठी मी आज बँकेला भेट देणार आहे.

किरीट सोमय्या म्हणाले की, आधी मुश्र्रीफ यांचा घोटाळा १५८ कोटी रूपयांचा असल्याचा अंदाज होता. मात्र प्रत्यक्षात हा आकडा पाचशे कोटींपेक्षा जास्तचा असून या प्रकरणात आपण शेवटपर्यंत पाठपुरावा करणार आहोत.


Protected Content

Play sound