जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील बजरंग बोगद्याजवळ रेल्वे रुळावर धावत्या मंगला एक्स्प्रेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवार, २० फेब्रुवारी रोजी रात्री १११ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी रेल्वे दूरक्षेत्र पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत तरुणाची ओळख पटविण्याचे आवाहन रेल्वे पोलिसांनी केले आहे. तरुण हा मंगला एक्स्प्रेस आल्यानंतर थेट तिच्यासमोर उभा राहिला होता, त्याने आत्महत्या केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जळगाव शहरातील बजरंग बोगद्याजवळ खांबा क्रमांक ४१८/९ ते ४१९/३ यादरम्यान रेल्वे रुळावर मंगला एक्स्प्रेसच्या समोर एक अनोळखी तरुण सापडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती जळगाव रेल्वे स्थानकावरील स्टेशन उपप्रबंधक यांनी रेल्वे पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळ गाठले व मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. याप्रकरणी रेल्वे दूरक्षेत्र पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक समाधान कंखरे हे करीत आहेत.
मयताची उंची ५ फूट ५ इंच , रंग सावळा, शरीर बांधा मजबूत, डोक्याचे केस काळे बारीक, डोळे मोठे, वय अंदाजे, ४० वर्ष, डाव्या हातावर अारती हे नाव गोंधलेले, अंगात निळया रंगाच शर्ट, काळ्या रंगाची पॅन्ट असे मयत तरुणाचे वर्णन असून त्याची ओळख पटविण्याचे आवाहन रेल्वे पोलिसांनी केले आहे, कुणालाही काही एक माहिती मिळाल्यास संबंधितांनी रेल्वे पोलीस स्टेशन ०२५८२२२३३८ या क्रमाकांवर तसेच तपास अंमलदार पोलीस नाईक समाधान कंखरे यांच्या ९९२१४७०९५१ या मोबाईल क्रमाकांवर संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.