Home Cities जळगाव शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे आमदारांना निवेदन

शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे आमदारांना निवेदन

0
38


फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी व सदस्य यांनी आपल्या विविध न्याय मागण्यासाठी संप पुकारलेला आहे. संपावर तातडीने तोडगा काढण्यात यावा अशी मागणीचे निवेदन येथील शिक्षकेतर कर्मचारी यांनी आ. शिरीष चौधरी यांना दिले आहे.

महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी व सदस्य यांनी आपल्या विविध न्याय मागण्यासाठी संप पुकारलेला आहे. त्याच अनुषंगाने धनाजी नाना महाविद्यालय फैजपूरच्या स्थानिक शाखेचे अध्यक्ष आर.आर. जोगी, डी.एस.चव्हाण, संतोष तायडे व उपाध्यक्ष राजेंद्र तायडे यांनी मंगळवारी २१ फेब्रुवारी रोजी रावेर विधानसभेचे आ. शिरष चौधरी यांची भेट घेऊन संघटनेच्या विविध न्याय मागण्यांचे निवेदन दिले, व सन्माननीय आमदार महोदयांना शासन दरबारी महाराष्ट्र राज्य कर्मचारी महासंघाच्या मागण्या आणि कालपासून पुकारलेला बेमुदत संप या संदर्भात योग्य ते मार्गदर्शन करून तोडगा काढावा व सहकार्य करावे अशी विनंती केली.


Protected Content

Play sound