Home राज्य एका स्त्रीचा अपमान करणार्‍यांना देव शिक्षा देतोच ! : कंगना

एका स्त्रीचा अपमान करणार्‍यांना देव शिक्षा देतोच ! : कंगना

0
47


मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिवसेनेची मालकी एकनाथ शिंदे यांच्याकडे गेल्यानंतर अभिनेत्री कंगना राणावत हिने उध्दव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.

अभिनेत्री कंगणा राणावत आणि शिवसेनेतील वाद चांगलेच गाजले होते. महाविकास आघाडीच्या राजवटीत कंगनाने आरोपांची सरबत्ती केली होती. तर, राज्य सरकारने तिच्या मुंबईतल्या कार्यालयाचा अनधिकृत असलेला भाग पाडून टाकला होता. ही सुडाची कारवाई असल्याचा आरोप तिने केला होता. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर कंगनाने ठाकरेंची खिल्ली उडविली होती. यानंतर आता शिवसेनेची मालकी ही एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयावर तिने खोचक भाष्य केले आहे.

कंगना राणावत हिने एक ट्विट केले आहे. यात म्हटले आहे की, वाईट वागल्यानंतर देवांच्या राजाला अर्थात इंद्रालादेखील त्याची शिक्षा मिळत असते. हा तर फक्त एक नेता आहे. ज्यावेळी त्यांनी माझं घर तोडलं, त्यावेळीच मला वाटलं होतं की यांचे वाईट दिवस आता सुरु होणार. एका स्त्रीचा अपमान करणार्‍याला देव शिक्षा देतोच. तो आता कधीच उठणार नाही.


Protected Content

Play sound