अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मध्यप्रदेशातील सीहोर येथे शिवमहाकथापुराण महोत्सव व रूद्राक्ष महोत्वासाठी खान्देशातील भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात झाल्याने दोन महिला जागीच ठार झाल्या तर इतर गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथील दोन महिला शोभाबाई लुकडू पाटील (वय-५२), कमलबाई आत्माराम पाटील (वय-५५) या दोन्ही महिलांसह मध्यप्रदेशातील सिहोर येथील शिवकथा महापुराण व रूद्राक्ष महोत्सवातून परत येत असतांना मध्यप्रदेशातील जुलवानानिया गावाजवळ (एमएच १९ डीव्ही ६७८३) या गाडीची भिषण अपघात घडली. या अपघातात शोभाबाई पाटील आणि कमलबाई पाटील या दोन्ही महिला जागीच ठार झाल्या. तर इतर गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. जखमी झालेल्या इतर भाविकांना शिरपूर येथील खासगी रूग्णालयात हलविण्यात आले आहे. रूद्राक्ष महोत्सवात अमळनेर शहरातील खटाबाई नेरकर नावाच्या महिला हरवल्या आहेत असे देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.