भुसावळात ‘लेडीज रन’च्या सराव सत्राचा उत्साहात शुभारंभ

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ स्पोर्ट्स ॲण्ड रनर्स असोसिएशनच्यावतीने लेडीज रनचे आयोजन करण्यात आले. यामध्ये आतापर्यंत २०० महिलांनी सहभाग नोंदविला आहे.

नावनोंदणी केलेल्या महिलांना धावण्याचा सराव व्हावा या उद्देशाने सराव सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. दर मंगळवार, गुरुवार व रविवार सकाळी ६ वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगण अर्थात डी एस ग्राउंड येथे सराव सत्र आयोजित केले आहे. त्याचा शुभारंभ रविवारी मोठ्या उत्साहात करण्यात आला. शहरातील प्रसिद्ध भूलतज्ञ डॉ संज्योत पाटील व ११ वर्षीय बाल धावपटू कृपा माळी यांच्या हस्ते विधिवत नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपस्थित महिला स्पर्धकांनी एकच जल्लोष केला.

या आधी सकाळी ६.०० वाजता क्रीडांगणावर जमलेल्या सर्व महिला स्पर्धकांचा वार्मअप व्यायाम घेण्यात आला. त्यानंतर उद्घाटनाच्या कार्यक्रमात डॉ नीलिमा नेहेते यांनी डॉ संज्योत पाटील यांचे स्वागत केले. याप्रसंगी डॉ संज्योत पाटील यांनी भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनच्या संपूर्ण कार्याचा आपल्या भाषणात गौरव केला. शहरातील सर्व महिलांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे व नियमित चालणे, धावणे, सायकलिंग, योगा आदि क्रीडा प्रकारात नियमितपणे सहभाग घ्यावा असे आवाहन केले. त्यानंतर उपस्थित धावपटू व महिला स्पर्धकांच्या वतीने या रनसाठी रेस डायरेक्टर असलेले प्रा प्रवीण फालक यांचा सत्कार ब्रिजेश लाहोटी यांनी केला.यावेळी प्रवीण वारके व गणसिंग पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण पाटील यांनी केले.

उदघाटनाच्या कार्यक्रमानंतर प्रत्यक्ष धावायला सुरुवात झाली. भुसावळ रनर्सच्या डॉ वर्षा वाडीले, नीलांबरी शिंदे, स्वाती फालक, संजीवनी लाहोटी, ज्योस्त्ना पाटील, चारुलता अजय पाटील, दीपा स्वामी, प्रियंका मंत्री, आरती चौधरी, सरोज शुक्ला, माधुरी चौधरी सर्व महिला स्पर्धकांना धावण्यासंदर्भातील सर्व बारकावे व्यवस्थित समजावून सांगत होत्या. त्यानंतर सर्व महिला धावपटू क्रीडांगणावर परतल्या. शेवटी स्ट्रेचिंग व्यायाम प्रकार डॉ चारुलता पाटील व डॉ नीलिमा नेहेते यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. त्यांना पूनम भंगाळे व पारुल वर्मा यांनी सहकार्य केले.

या सराव सत्रात प्रथमच सहभागी झालेल्या डॉ अनिता भिरूड , प्रतिमा अग्रवाल, पल्लवी अंबाडे, आशास्त्री योगेश अलेकर, भाग्यश्री कुंभलकर, सीमा सोनवणे,विधी तायडे, प्रिशा मंगतानी या महिला स्पर्धकांनी पहिल्या दिवशी शास्त्रीय पद्धतीने रनींग संदर्भात केलेल्या मार्गदर्शनाचे व आयोजकांनी घेतलेल्या मेहनतीचे कौतुक केले व समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारती चव्हाण, स्वाती भोळे, मंजू शुक्ला, मोनिका देशमुख, किरण गोंथला, पुष्पा चौधरी, सरला पाटील, पुष्पा वंजारी, छोटू गवळी, दीपेश सोनार, विश्वजीत वाघ, यतीन कोल्हारकर यांनी सहकार्य केले.

Protected Content