आदर्श शेतकरी पुरस्काराने मयूर वाघ सन्मानित

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील बांबरुड येथील युवा शेतकरी मयूर अरुण वाघ यांनी कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना नुकतेच आदर्श शेतकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

कृषी सेवक राज्यस्तरीय पुरस्कार – २०२३ चा सन्मान सोहळा नुकताच रावेर येथील शेनाबाई गोडू पंडित मराठा समाज मंगल कार्यालय, स्टेशन रोड येथे उत्साहात संपन्न झाला. कृषी सेवकाच्या वर्धापन दिनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तत्पूर्वी कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल आदर्श शेतकरी पुरस्कार – २०२३ पाचोरा तालुक्यातील बांबरुड (राणीचे) येथील युवा व प्रयोगशील शेतकरी मयूर अरुण वाघ यांना हा मिळाला आहे. हा पुरस्कार रावेर मतदारसंघाचे आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार अरुण पाटील, जळगांव लोकसभेचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील व रावेर येथील तहसिलदार उशाराणी देवगुणे या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन प्रदान करण्यात आला. याबाबत वाघ यांचे सर्व ठिकाणाहून कौतुक करण्यात येत आहे.

Protected Content