Home क्राईम तरुणाला मारहाण करत त्याचा मोबाईल फोडला

तरुणाला मारहाण करत त्याचा मोबाईल फोडला

0
48


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील तानाजी मालुसरे नगरात तरुणाला एका जणाने बेदम मारहाण केल्याच्या घटनेप्रकरणी शुक्रवार, ३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

जळगाव शहरातील तानाजी मालुसरे नगरात गणेश छगन डोळे वय २१ हा तरुण राहतो, तो कापड दुकानात कामाला आहे. १९ जानेवारी रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास गणेश हा त्याच्या घरासमोर असतांना, यावेळी दिनकर नगरातील शिवदास बापू सोनवणे हा आला. गणेश याने लाकडी पाट्या जाळल्याचा संशय व्यक्त करत शिवदास याने गणेश यास शिवीगाळ केली, तसेच याच कारणावरुन शिवदास याने दुचाकीच्या चॅबीने गणेशच्या हातावर, पाठीवर, मारुन दुखापत केली, तसेच डोक्यावर बुक्क्याने मारहाण केली, याचदरम्यान शिवदास याने गणेश याचा मोबाईल फोडून नुकसान केले. याप्रकरणी तब्बल १५ दिवसानंतर शुक्रवारी गणेश डोळे यान शनिपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावरुन शिवदास बापू सोनवणे याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल परीस जाधव हे करीत आहेत.


Protected Content

Play sound