जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नवीन बसस्थानक परिसरातून एका व्यावसायिकाची १५ हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उडघकीला आली आहे. याप्रकरणी सोमवारी ३० जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शुभम नरेश कुमार हंडी (वय-२६) रा. सम्राट कॉलनी जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. बळीपेठेत होजीअरीचे दुकान लावून आपला उदरनिर्वाह करतो. व्यवसाय करण्यासाठी दुचाकी (एमएच १९ सीडी ६६०६) चा वापर करतो. रविवारी २९ जानेवारी रोजी चोपडा जाण्यासाठी नवीन बसस्थानक येथे दुचाकीने आले. त्यावेळी नवीन बसस्थानक आवारातील वडाच्या झाडाजवळ दुचाकी पार्क करून ते व्यवसाय करण्यासाठी चोपडा येथे निघून गेले. रात्री ९ वाजता चोपडा येथून परत असल्यानंतर त्यांना जागेवर दुचाकी दिसून आली नाही. दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही मिळून आली नाही. अखेर सोमवारी ३० जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.