Home क्राईम अनोळखी तरूणाचा रेल्वेखाली संशयास्पद मृत्यू

अनोळखी तरूणाचा रेल्वेखाली संशयास्पद मृत्यू


Crime

जळगाव प्रतिनिधी । गिरणा पंपींग रस्त्यावरील बोगद्यावर असलेल्या जळगाव- मुंबईच्या डाऊन रेल्वेलाईनवरील रुळावर रविवारी सकाळी 10.30 वाजता अंदाजे 20 ते 22 वर्षीय तरूणाचा मृतदेह आढळून आला. त्या व्यक्तीने आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. अद्यापर्यंत मयताची ओळख पटलेली नाही. मृतदेहाजवळ केवळ मयताची सॅन्डल तसेच अंगावरील कपड्यांच काही तुकडे आढळून आल्याने ओळख पटविण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वेच्या डाऊन रेल्वे लाईनवर खंबा क्रमांक 415/13 ते 415/15 दरम्यान तरुणाचा मृतदेह असल्याची माहिती स्टेशन प्रबंधक जानकीराम सपकाळे यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात कळविली. त्यानुसार रामानंदनगर पोलीस ठाण्याचे अनिल फेगडे व सुभाष सोनवणे या कर्मचार्‍यांनी घटनास्थळ गाठले. अर्धे धड एकीकडे, हात, पाय वेगवेगळ्या ठिकाणी पडलेले अशा छिन्नविच्छीन्न अवस्थेत मृतदेह होता. सर्व अवयव एका ठिकाणी जमा करुन अनिल फेगडे यांनी रुग्णवाहिका चालक सुनील खाचणे यांनी फोन केला. त्यानी रुग्णवाहिकेतून मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणला. चेहराही छिन्नविछिन्न अवस्थेत असून मृतदेहाजवळ केवळ कपड्याचे तुकडे तसेच तुटलेली चप्पल आढळून आली आहे. पोलिसांनी पंचनामा केला असून ओळख पटविण्याचे आव्हान केले आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे.


Previous articleमी पद्मदुर्ग बोलतोय….!
Next articleजेसीआय डायमंड सिटीतर्फे अन्नदान
पत्रकारितेत १५ वर्षांचा अनुभव. मुद्रीत, इलेक्ट्रॉनिक आणि डिजीटल या तिन्ही माध्यमांमध्ये पारंगत. क्राईम आणि राजकीय स्टोरीज ही स्पेशालिटी. वृत्तासोबतच प्रतिमा आणि व्हिडीओ एडिटींगमध्येही कौशल्य ही अजून एक खासियत. लाईव्ह ट्रेंडस न्यूजमध्ये पहिल्या दिवसापासून कार्यरत असणारे जितेंद्र कोतवाल हे आता वृत्तसंपादक पदाचा कार्यभार सांभाळत आहेत. बातम्यांसाठी संपर्क : ९३७०४०३२००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound