Home Cities मुक्ताईनगर दिवंगत कन्येच्या स्मरणार्थ शालेय प्रवेशद्वाराची उभारणी !

दिवंगत कन्येच्या स्मरणार्थ शालेय प्रवेशद्वाराची उभारणी !

0
47


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील घोडसगाव येथील शाळेत कार्यरत शिक्षक भिका जावरे यांनी आपल्या दिवंगत कन्येच्या स्मरणाई शाळेला प्रवेशद्वार तयार करून दिले असून याचे लोकार्पण करण्यात आले.

जि.प.प्राथमिक शाळा घोडसगाव शाळेतील कार्यरत शिक्षक भिका जावरे सर यांची कन्या स्नेहल यांचे दुर्धर आजाराने निधन झाले आहे. आपल्या कन्येच्या स्मृती चिरंतन रहाव्या म्हणून त्यांनी त्यांची दिवंगत मुलगी स्वर्गीय कुमारी स्नेहल भिका जावरे यांच्या स्मरणार्थ जि.प.शाळा घोडसगाव शाळेला स्वखर्चातून प्रवेश द्वार बांधून दिले. त्याचा लोकार्पण सोहळा आज दिनांक २६ जानेवारी रोजी सौ.सविता भिका जावरे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आला
यावेळी ग्रामपंचायत सरपंच सौ. प्रतिभाताई कोल्हे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ.दिपाली दुट्टे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य,सर्व व्यवस्थापन समिती सदस्य, गावकरी, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, दिवंगत कन्येच्या स्मृत चिरंतन रहाव्यात म्हणून प्रवेशद्वार उभारून देणारे शिक्षक भिका जावरे यांचे परिसरातून कौतुक होत आहे.


Protected Content

Play sound