Home क्राईम भुसावळातील मुकेश भालेराव एमपीडीए अंतर्गत स्थानबध्द

भुसावळातील मुकेश भालेराव एमपीडीए अंतर्गत स्थानबध्द

0
48
jail11 2017071030

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | विविध गुन्हे दाखल असणारा मुकेश प्रकाश भालेराव या गुन्हेगाराला एमपीडीए कायद्याच्या अंतर्गत स्थानबध्द करण्यात आले असून त्याची नाशिक कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

भुसावळातील गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी आधी अनेक गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आलेले आहे. यासोबत पोलीस प्रशासनाने गंभीर गुन्हे असलेल्या उपद्रवींना महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा अर्थात एमपीडीए अंतर्गत कारवाईसाठी प्रस्ताव सादर केले होते. यातील मुकेश प्रकाश भालेराव ( रा. टेक्नीकल हायस्कूलच्या मागे, भुसावळ) याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. हा प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे. यामुळे आता त्याला एमपीडीए अंतर्गत स्थानबध्द करण्यात आले आहे.

मुकेश भालेराव याच्यावर शहर आणि तालुका पोलीस स्थानकांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यात खुनाचा प्रयत्न, दंगा, आत्महत्येचा प्रयत्न आदी गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. आता एमपीडीएच्या अंतर्गत कारवाई करण्यात आल्याने त्याला नाशिक येथील कारागृहात स्थानबध्द करण्यात आले आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक एम. रामकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी व डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी केली. या कारवाईमुळे भुसावळच्या गुन्हेगारीविश्‍वात खळबळ उडाली आहे.


Protected Content

Play sound