जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महान स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये अभिवादन करण्यात आले.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील काऊंसिल हॉल येथे आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला मार्ल्यापण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, सदस्या डॉ.केतकी पाटील यांची विशेष उपस्थीती होती.
मान्यवरांच्याहस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला मार्ल्यापण करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एन.एस.आर्विकर, रजिस्ट्रार प्रमोद भिरुड, स्व.गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हर्षल बोरोले, फिजीओथेरपी महाविद्यालयातील प्रा.डॉ.निखील चौधरी यांच्यासह वैद्यकीय अभ्यासक्रमाचे विद्यार्थी उपस्थीत होते.