आदिवासी विकास पतसंस्थेच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनल विजयी

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आदिवासी विकास विभाग पतसंस्थेच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनलला स्पष्ट बहुमत मिळाल्याने सत्ता बदल करण्यात परिवर्तन पॅनलचे प्रमुख एस.डी. पाटील व संभाजी पाटील यांना यश आले आहेत.

 

प्रचार प्रसंगी या पतसंस्थेच्या निवडणुकीत चांगलीच चुरस वाढली होती. परिवर्तन पॅनलला सहा तर सहकारला पाच जागेवर समाधान मानावे लागले. प्रचाराच्या वेळेस आरोप प्रत्यारोपाच्या फेरी झाडल्या गेल्या. मात्र मतदार राजांनी परिवर्तन पॅनलच्या गळ्यात विजयाची माळ टाकली. त्यामुळे परिवर्तन पॅनलला मतदार राजांनी पसंती दाखवली. परिवर्तन पॅनल कडून एस. डी पाटील, संभाजी पाटील, विजय कचवे आदींनी प्रचारामध्ये मुसंडी मारली होती. सहकार पॅनल कडून मनोज हिम्मतराव ठाकरे व त्यांचे सहकाऱ्यांनी प्रचाराची धुरा सांभाळली होती.

 

विजयी उमेदवार

लिलाधर मन्साराम पाटील, मनोज हिम्मतराव ठाकरे, मनेश रज्जाक तडवी, संभाजी सिताराम पाटील, मनोज दत्तात्रय पिंगळे, विनोद भिला पाटील, अलका वामन सरदार, रचना रामभाऊ पाटील, अविनाश पंडितराव शिवरामे,  प्रशांत बारसू बोदवडे, विलास बुधा भोई विजयी झाले आहेत.

Protected Content