Home Cities पाचोरा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या रिंगणात शुभांगी पाटील !

पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या रिंगणात शुभांगी पाटील !

0
88

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | नाशिक विभाग पदवीधर मतदार संघातुन युवा नेत्या तथा महाराष्ट्र राज्य टिचर्स असोसिएशनेच्या राज्याध्यक्षा अ‍ॅड. शुभांगी पाटील (सुर्यवंशी) यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

राज्यात येत्या ३० जानेवारी ला होवु घातलेल्या शिक्षक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी नाशिक विभाग पदवीधर मतदार संघातुन युवा नेत्या तथा महाराष्ट्र राज्य टिचर्स असोसिएशनेच्या राज्याध्यक्षा अ‍ॅड. शुभांगी पाटील (सुर्यवंशी) यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करते प्रसंगी अ‍ॅड. विवेक सुर्यवंशी, प्रा. जसपालसिंह सिसोदिया, धुळे वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. दिलीप पाटील यांच्या सह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

ऍड. शुभांगी पाटील यांनी शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात नुकत्याच नागपुर येथे संपन्न झालेल्या अधिवेशनात जावुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शिक्षकांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक चर्चा करुन मागण्यांचे निवेदन दिले आहे. या अनुषंगाने त्यांनी पदवीधर मतदारसंघातून आपली उमेदवारी दाखल केली आहे.


Protected Content

Play sound