Home Cities अमळनेर मोबाईल दुकानातून १० मोबाईल लांबविले

मोबाईल दुकानातून १० मोबाईल लांबविले

0
176


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील माळीवाडा परिसरातील एका दुकानातून ५२ हजार रूपये किंमतीचे १० मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात रविवारी ८ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमळनेर पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, साजीद खान रशीद खान रा. शाह आलम नगर, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्याचे माळीवाडा परिसरात मोबाईल विक्रीचे दुकान आहे. शनिवारी ७ जानेवारी रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्याने दुकान फोडून दुकानातील ५२ हजार रूपये किंमतीचे १० मोबाईल चोरून नेल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी साजीद खान याने रविवारी ८ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय पाटील करीत आहे.


Protected Content

Play sound