Home Cities अमळनेर वाळूची चोरटी वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले

वाळूची चोरटी वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील राजाराम नगर परिसरातून अवैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर अमळनेर पोलिसांनी कारवाई केली आहे. याबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात मंगळवार २७ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमळनेर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील राजाराम नगर परिसरातून विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरमधून वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती अंमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी कारवाईच्या सूचना दिल्या. पोलीस पथकाने मंगळवारी २७ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता कारवाई करत वाळूचे ट्रॅक्टर पकडले. ट्रॅक्टर चालकाला वाळू वाहतुकीचा परवाना विचारला असता त्याने उडवा उडवीची उत्तर दिले. तसेच ट्रॅक्टर मधील वाळू खाली करून ट्रॅक्टर घेऊन पसार झाला. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात पोलीस नाईक योगेश पाटील यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक दीपक गणेश पाटील रा. शिरूर नाका अमळनेर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार विलास पाटील करीत आहे.


Protected Content

Play sound