जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील शिरसोली गावातून एका खासगी नोकरदाराचे बंद घर फोडून घरातून सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकुण १ लाख रूपये किंमतीच मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सोमवारी २६ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, प्रभाकर आनंदा पाटील (वय-५३, रा. शिरसोली ता.जि.जळगाव) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. सोमवारी २६ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते दुपारी २ वाजेच्या दरम्यान त्यांचे घर बंद असतांना अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून घरातून सोन्याचे दागिने, चांदीचे कळे आणि २० हजार रूपयांची रोकड असा एकुण १ लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे समोर आले आहे. हा प्रकार घडल्यानंतर प्रभाकर पाटील यांनी लागलीच एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून सायंकाळी ७ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ जितेंद्र राठोड करीत आहे.