Home Cities जळगाव म्हसावद येथे संत गाडगेबाबा यांना अभिवादन

म्हसावद येथे संत गाडगेबाबा यांना अभिवादन

0
32


जळगाव  – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील म्हसावद ग्रामपंचायत येथे संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त  त्यांच्या प्रतिमेलाअभिवादन करण्यात आले.

 

म्हसावद ग्रामपंचायत कार्यलयात संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच गोविंदा पवार, माजी सभापती यशवंत पवार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सुमेध नेतकर व यशवंत पवार यांनी संत गाडगेबाबा यांच्या कार्याची माहिती दिली. याप्रसंगी अॅड. शीतल चिंचोरे, ग्रामपंचायत सदस्य मीनाबाई चिंचोरे, बापू धनगर, विजू कटारिया, महेंद्र चिंचोरे, सचिन चव्हाण, भंगाळे सर, राजू कुमावत, पिंगळे सर, ग्रामसेवक योगराज चिंचोरे, केशव सूर्यवंशी, प्रकाश रोकडे, समाधान निसाळकर, सुनील सूर्यवंशी, पत्रकार दीपक महाजन, वास्तव पोस्टचे संपादक दीपक जाधव आदी उपस्थित होते. याश्वितेसाठी ग्रामपंचायत कर्मचारी अशोक हुजरे, सुनील अहिरे यांनी सहकार्य केले.

 


Protected Content

Play sound