Home Cities जामनेर मोठी बातमी : खा.सी.आर.पाटील यांच्या कन्येच्या पॅनलचा पराभव

मोठी बातमी : खा.सी.आर.पाटील यांच्या कन्येच्या पॅनलचा पराभव


जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आज तालुक्यात एक अतिशय धक्कादायक अशा राजकीय घटनेची नोंद झाली असून मोहाडी ग्रामपंचायतमध्ये भाजपचे मातब्बर खासदार सी.आर.पाटील यांच्या कन्येच्या पॅनलचा पराभव झाला आहे.

जामनेर तालुक्यातील मोहाडी येथे गेल्या पाच वर्षात भारतीय जनता पक्षाच्या गुजरात प्रदेशाध्यक्ष तथा मातब्बर खासदार म्हणून गणले गेलेले सी.आर. पाटील यांची कन्या भाविनी पाटील या निवडणूकीच्या रिंगणाात उभ्या होत्या. मागील काळात त्या मोहाडी ग्रामपंचायतीवर लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आल्या होत्या. या ५ वर्षात त्यांनी गावात समाधानकारक विकासकामे करून ग्रामस्थांची कौतुकाची थाप मिळवली होती. दरम्यान यंदा त्यांच्यासमोर प्रा. शरद पाटील यांचे पॅनल उभे होते. लक्षणीय बाब अशी की, मोहाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेसने भाविनी पाटील यांच्या पॅनलला पाठिंबा दिला असला तरी भारतीय जनता पक्षाचे पॅनल त्यांच्यासमोर उभे राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते. निवडणुकीच्या काळात मोठी चुरस पाहायला मिळाली होती, दरम्यान या निवडणुकीमध्ये भाविनी पाटील या ग्रामपंचायत सदस्य पदासाठी उभ्या होत्या तर त्यांचे सहकारी हे सरपंच पदासाठी उभे होते. आज लागलेल्या निकालात त्यांचा सरपंचपदाचा उमेदवार पराभूत झाला असून पॅनल मधील फक्त तीन सदस्य निवडून आले आहेत. यामुळे त्यांचा येथे पराभव झाला आहे. या निवडणूकीत सरपंच म्हणून चंद्रकला रघुनाथ कोळी या भाजपच्या उमेदवार विजयी झाल्या आहे. त्यांच्या पॅनलच्या ६ जागा निवडून आल्या आहे.


Protected Content

Play sound