चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून मुलाच्या बापाला धारदार कोयत्याने वार करून निर्गुण खून केल्याची घटना चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे गावात १६ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली होती. या गुन्ह्यातील दोन संशयित आरोपींना मेहुणबारे पोलिसांनी अटक केली आहे. दोघांवर चाळीसगाव पोलीस ठाण्यात मेहुनबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
सचिन राजेंद्र चव्हाण आणि सागर सुनील सूर्यवंशी दोन्ही रा. मेहुणबारे ता.चाळीसगाव असे अटक केलेल्या दोन्ही संशयित आरोपींची नावे आहेत.
दगडू वामन खैरनार (गढरी) (वय-५२,रा. तिरपोळे ता.चाळीसगाव) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला होते. त्यांचा मुलगा जगदीश खैरनार याने सचिन राजेंद्र चव्हाण यांच्या बहिणीशी पळून तीन महिन्यापूर्वी प्रेमविवाह केला होता. याचा राग मनात धरून सचिन चव्हाण याने त्याचा मित्र सागर सुनील सूर्यवंशी यांच्या मदतीने काटा काढण्याचा निर्णय घेतला. जगदीश खैरनार याचे वडील दगडू वामन खैरनार हे १६ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता मेहुणबारे येथे रेशन घेण्यासाठी आले होते. रेशन घेऊन ते पुन्हा तिरपोळे गावाला जात असताना संशयित आरोपी सचिन राजेंद्र चव्हाण आणि सागर सुनील सूर्यवंशी यांनी गावातील शाळेजवळ रस्ता अडून त्यांच्या मानेवर धारदार कोयत्याने वार करून निर्गुण खून केला होता. व घटनास्थळावरून पसार झाले होते. या घटनेमुळे मेहुणबारे शहर हादरले होते. या संदर्भात मेहुनबारे पोलीस ठाण्यात दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयितांचा शोध घेणे सुरू झाले. या गुन्ह्यातील मुख्य संशयित आरोपी सचिन चव्हाण याला रविवारी १८ डिसेंबर रोजी पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथून अटक केली होती. त्यानंतर तांत्रिक पुराव्याच्या आधारे त्याचा मित्र सागर सूर्यवंशी याला देखील सोमवारी १९ डिसेंबर रोजी दुपारी अटक केली आहे. दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २३ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
यांनी केली कारवाई
जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, चाळीसगाव विभागीय पोलीस अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मेहुणबारे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णू आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाण, राजू सांगळे, पोहेकॉ अरुण पाटील, गोरख चकोर, पोलीस कॉन्स्टेबल कमलेश राजपूत, शैलेश माळी, जितू परदेशी, हनुमंत वाघेरे यांनी कारवाई केली.